'पतीचा आक्षेप डावलून परपुरुषाशी रात्री उशिरापर्यंत बोलणं कौटुंबीक छळ': Kerala High Court

Continues below advertisement

नवऱ्यानं आक्षेप घेऊनही पत्नी दुसऱ्या पुरुषाशी रात्री उशिरापर्यंत फोनवरून बोलते हा कौटुंबीक छळ आहे असा निकाल केरळ उच्च न्यायालयानं दिला आहे. या खटल्यात न्यायालयानं पतीला घटस्फोट मंजूर केलाय. याबाबत कुटुंब न्यायालयाचा निर्णय हायकोर्टानं रद्द केला. पती पत्नीमध्ये गेली अनेक वर्षे वाद होता.  प्रदूषण नियंत्रण मंडळात काम करणारी पत्नी तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी रात्री उशिरापर्यंत फोनवरून बोलत असल्यानं पतीनं आक्षेप घेतला होता. पण त्याला न जुमानता ती रात्री उशिरापर्यंत फोनवरून बोलत असल्यानं पतीनं तिच्याविरोधात व्यभिचार आणि कौटुंबीक छळाचा तक्रार करत घटस्फोटासाठी अर्ज केला. कुटुंब न्यायालयानं तो फेटाळला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram