Talegaon Chakan महामार्ग खड्ड्यात, खड्ड्यांमुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी, सामान्यांचे पैसे खड्डयात
महाराष्ट्र राज्यात सर्वत्र रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. खराब रस्त्यांमुळे आणखीन किती लोकांचा जीव जाणार? असा सवाल हायकोर्टानं केलाय. महामार्गांवरील खड्ड्यांबाबत राज्य सरकारनं गांभीर्यानं काम करायला हवं, असं म्हणत कोर्टाने खडसावलं आहे. एबीपी माझाने खड्डेमुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी ही मोहीम राबवली आहे. राज्यभरातून रस्त्यांचा रिअॅलिटी चेक आम्ही या मोहिमेत करत आहोत.