Tadoba : ताडोबात अस्वल आणि वाघीण एकमेकांसमोर, पर्यटकांनी श्वास रोखला
Continues below advertisement
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघीण आणि अस्वल एकमेकांपुुढे आले होते. ताडोबाच्या देवाडा भागात सफरीसाठी आलेल्या पर्यटकांनी ही दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत. अस्वल आणि वाघीण काही वेळासाठी एकमेकांसमोर ठाकले होते. मात्र, एकमेकांना दम दिल्यानंतर हे दोघेही वेगवेगळ्या दिशेनं निघून गेलेत. मात्र, यावेळी सफरीसाठी आलेल्या पर्यटक चांगलेच दचकले होते.
Continues below advertisement