Vita Sangli : स्वच्छ सर्वेक्षणात विटा नगरपालिकेचा अव्वल, सफाई कर्मचारी शांताबाई हत्तीकर यांचा गौरव
Continues below advertisement
स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम आलेल्या विटा नगरपालिकेचा दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला. महिला सफाई कर्मचारी शांताबाई हत्तीकर यांना राष्ट्रपतींकडून हा पुरस्कार स्वीकारण्याचा बहुमान मिळाला. गेल्या 34 वर्षांपासून हत्तीकर हातात झाडू घेऊन विटा शहरात साफसफाईचे काम करतात. या गौरव सोहळ्यावेळी नगराध्यक्ष प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील उपस्थित होते. विटा नगरपालिकेच्या नागरिकांनी आणि सफाई कर्मचाऱ्यांनी हा गौरव एलईडी स्क्रीनवर पाहिले. पुरस्कार मिळताच फटाक्यांची आतषबाजी आणि टाळ्या वाजवत जल्लोष केला.
Continues below advertisement