Swabhimani Shetkari Raju Shetti Protest: सांगली जिल्ह्यात ऊस दरासाठी स्वाभिमानी पुन्हा आक्रमक

Continues below advertisement

सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी अद्याप कायम आहे. साखर कारखानादारांनी योग्य निर्णय घेतला नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आता पुन्हा आंदोलनाचा हत्यार उपसण्यात आले आहे. आजपासून जिल्ह्यातील ऊस वाहतूक रोखण्याचा निर्णय स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतला आहे. त्याचबरोबर एक डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्यासमोर काटा बंद आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram