Ravikant Tupkar : 18 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांसाठी हिताचे निर्णय घ्या, रविकांत तुपकरांचे अल्टिमेटम
Continues below advertisement
लातूर जिल्ह्यातील औसा येथे पार पडलेल्या शेतकरी आणि निराधार महिला मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला अल्टिमेटम दिलंय.१८ जानेवारीपर्यंत शेतकरी हिताचे निर्णय घ्या अन्यथा मुंबई दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रोखू असा इशारा तुपकर यांनी दिलाय. औसामध्ये शेतकरी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चासाठी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती.
Continues below advertisement