Swabhiman Shetkari Sanghatana महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेणार?
Continues below advertisement
राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी महाविकास आघाडीवर नाराज असल्याचं कळतंय. 5 एप्रिलला स्वाभिमानीची कार्यकारणी सभा कोल्हापुरात होतेय. या सभेत यासंदर्भातला अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र यात स्वाभिमानेचे एकमेवर आमदार देवेंद्र भुयार काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. कारण निवडून आल्यापासून भुयार स्वाभिमानीच्या संपर्कात नसल्याचं कळतंय. कार्यकारिणीच्या पोस्टरवरही भुयार यांचा फोटो नाहीये. त्यामुळे चर्चेला उधाण आलय. स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपशी हातमिळवणी करू शकते असेही कयास आता राजकीय तज्ज्ञांनी बांधायला सुरुवात केलेय.
Continues below advertisement