Sushma Andhare Vs Naresh Mhaske | राजकीय कुरघोड्या करण्यासाठी देशवासीयांच्या जखमेवर मीठ चोळू नका
Sushma Andhare Vs Naresh Mhaske | राजकीय कुरघोड्या करण्यासाठी देशवासीयांच्या जखमेवर मीठ चोळू नका
आमचे भारतीय भाऊ बहीण शोकसागरात बुडाले आहेत. तुमच्या श्रेयवादाच्या राजकारणात कुरघोड्या करण्यासाठी कृपया देशवासीयांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. मस्के साहेब इतका अन्याय करू नका...
हे ही वाचा..
Amrendra Kumar Singh on Pahalgam Terror Attack : अवघ्या देशाचे नंदनवन असलेल्या दक्षिण जम्मू आणि काश्मीरमधील मिनि स्वित्झर्लंड ओळख असलेल्या पहलगामध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघा देश स्तब्ध होऊन गेला आहे. मात्र दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवाद्यांकडून उच्चारलेल्या शब्दांमुळे देशामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. यानंतर 'धर्म पुछा, जाति नही' असे म्हणत उन्मादी प्रवृत्तींनी विखारी प्रचाराला प्रारंभ करत स्थानिक काश्मिरी लोकांना सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये हिंदी विरुद्ध मुस्लिम असा सुद्धा रंग देण्याचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी आणि दहशतवाही हल्ल्यापासून अवघ्या 300 ते 400 मीटर दूर असलेल्या अमरेंद्र कुमार सिंह यांनी (Amrendra Kumar Singh on Pahalgam Terror Attack) या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्यांना सणसणीत चपराक दिली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटर पोस्टने धर्मांधाना चपराक बसली आहे.
हॉटेलवाल्यांनी पेमेंट घेतलं नाही, गाडीवाल्यांनी पैसे घेतले नाहीत
अमरेंद्र कुमार सिंह सपत्नीक जम्मू-काश्मीर पर्यटनासाठी गेले होते आणि त्यांनी जो काही रक्तपात बैसरन व्हॅलीमध्ये झाला तो त्यांनी प्रत्यक्ष पाहिला. यानंतर त्यांनी ट्विटर पोस्ट करून एक प्रकारे तेथील भयकंप सांगण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक लोकांनी कशा पद्धतीने मदत केली याबाबत त्यांनी सांगितलं आहे. गिधाडं संधी शोधत असतात. मात्र ज्या ठिकाणी हॉटेलवाल्यांनी पेमेंट घेतलं नाही, गाडीवाल्यांनी पैसे घेतले नाहीत, ड्रायव्हर सुद्धा रडत होता. जबरदस्ती केल्यानंतर त्याने टिप्स घेतली. मात्र, त्याचवेळी श्रीनगर ते दिल्ली विमान तिकीट 38 हजार झालं होतं, अशा शब्दात त्यांनी आपली संताप व्यक्त केला. दहशतवादी दहशतवाद्यांविरुद्धची लढाई सुरूच राहिली पाहिजे आणि संपूर्ण राष्ट्राने यामध्ये एकजूट राहिले पाहिजे असे अमरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.