Phaltan Faceoff: 'तुम्ही स्वतःला आरोपी का म्हणताय?', Sushma Andhare यांचा Ranjitsinh Nimbalkar यांना सवाल
Continues below advertisement
फलटणमधील (Phaltan) राजकीय वातावरण शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik-Nimbalkar) यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे तापले आहे. 'तुम्ही उत्तर का देताय? आम्ही तुम्हाला आरोपी म्हनलंय का? तुम्ही स्वतःला आरोपी का म्हणताय?', असा थेट सवाल सुषमा अंधारे यांनी निंबाळकरांना केला आहे. निंबाळकर यांच्यावर एका स्थानिक डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दबाव टाकल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे, ज्यानंतर निंबाळकरांनी ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर, आज फलटणच्या गजानन चौकात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सभा होत असून, ते या आरोपांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी निंबाळकर यांची पाठराखण केली होती, मात्र अंधारेंनी आरोपांची मालिका सुरूच ठेवली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement