Sushma Andhare : ननावरे दाम्पत्याचा व्हिडिओ दाखवत, त्यांनी जीवन का संपवलं?; अंधारेंचा थेट सवाल
Continues below advertisement
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी साताऱ्यातील ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्या प्रकरणावरून पत्रकार परिषदेत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 'ननावरे दाम्पत्याने आत्महत्या का केली?' असा थेट सवाल सुषमा अंधारे यांनी केला. नंदकुमार ननावरे आणि त्यांच्या पत्नीने १ ऑगस्ट २०२३ रोजी उल्हासनगरमध्ये आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, ज्यामध्ये त्यांनी भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) यांच्यासह काही लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. अंधारे यांनी हाच व्हिडिओ पत्रकार परिषदेत दाखवत या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. या प्रकरणात काही जणांना अटक झाली होती, मात्र नंतर त्यांना जामीन मंजूर झाला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement