Sushma Andhare on Neelam Gorhe : निलम गोऱ्हेंचा ठाकरेंना जय महाराष्ट्र, सुषमा अंधारे कडाडल्या

Neelam Gorhe : बंडाच्या एकवर्षानंतरही ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटातील संघर्ष कायम आहे. अजूनही ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत (Shiv Sena) येणाऱ्यांचा ओघ काही कमी होण्याचं नाव घेत नाही. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंची कास धरली आहे. आज विधीमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी बोलताना नीलम गोऱ्हे यांना सुषमा अंधारे आल्यामुळे ठाकरे गटातील महिला नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा होत असल्यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावेळी नीलम गोऱ्हेंनी सटरफटर लोकांमुळे नाराज होण्याची परिस्थिती नाही, असं वक्तव्य केलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola