Sushma Andhare : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचं निलम गोऱ्हेंना पत्र

Continues below advertisement

Sushma Andhare  : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचं निलम गोऱ्हेंना पत्र हक्कभंग कारवाईच्या संदर्भात दिलेल्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या
निर्देशांबाबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्र लिहिलं आहे. मी माफी अजिबात मागणार नाही. यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरी माझी तयारी आहे, असं अंधारे यांनी पत्रात म्हटलं आहे.
उपसभापती नीलम गोऱ्हे रविंद्र धंगेकरांना   सभागृहात बोलू देत नाहीत अशा आशयाचा व्हिडीओ सुषमा अंधारेंनी प्रसिद्ध केला होता. मुळात धंगेकर या सभागृहाचे सदस्य नाहीत त्यामुळे तात्काळ सुषमा अंधारे यांच्यवर हक्कभंग आणावा, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली होती. त्यानंतर अंधारेंना आठ दिवसात दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितलं होतं. तसंच दिलगिरीचं पत्र न आल्यास प्रवीण दरेकरांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देईन, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या होत्या. त्यानंतर सुषमा अंधारेंनी हे पत्र लिहिलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram