Sushma Andhare : फलटण प्रकरणी पोलीस स्टेशनवर अंधारेंचा मोर्चा, SIT स्थापन केलीच नसल्याचा आरोप
Continues below advertisement
फलटण आत्महत्या (Phaltan Suicide) प्रकरणावरून शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सरकार आणि पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 'काही लोक एसआयटी म्हणाले, मी तर उच्चस्तरीय चौकशीच म्हणतेय, पण सरकारने याची एसआयटी सुद्धा केली नाही,' असा थेट आरोप अंधारेंनी केला. फलटण पोलीस स्थानकावर मोर्चा काढत त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. संबंधित प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात (Fast Track Court) चालवावे आणि महिला डॉक्टर विषयीचा आक्षेपार्ह मजकूर सार्वजनिक डोमेनमधून काढून टाकावा, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले असले तरी, एसआयटीच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement