Asim Sarode License Suspended असीम सरोदेंना वादग्रस्त वक्तव्य भोवलं, वकिली सनद तीन महिन्यांसाठी रद्द

Continues below advertisement
पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि वकील असीम सरोदे (Aseem Sarode) यांची वकिलीची सनद महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने (Bar Council of Maharashtra and Goa) तीन महिन्यांसाठी निलंबित केली आहे. 'राज्यपाल 'फालतू' आहेत', असं वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना हा दणका बसला आहे. अॅडव्होकेट विवेकानंद घाटगे (Adv. Vivekanand Ghatge) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय दिला. सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांविरोधात वादग्रस्त विधानं केली होती. 'न्यायव्यवस्था सरकारच्या दबावाखाली आहे', असंही ते म्हणाले होते. याप्रकरणी त्यांच्यावर तीन महिन्यांच्या निलंबनाव्यतिरिक्त २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे सरोदे यांना पुढील तीन महिने कोणत्याही न्यायालयात वकिली करता येणार नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola