ED Summons | सुरेश रैना ED च्या रडारवर, बेटिंग ॲप प्रकरणी चौकशीसाठी बोलावले
माजी क्रिकेटर सुरेश रैना क्रिकेट बेटिंग ॲप प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) रडारवर आला आहे. त्याला आज दिल्लीतील कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. भारतात बंदी असलेल्या 'वनेक' सारख्या बेटिंग ॲपची जाहिरात त्याने केली होती. या बेटिंग प्लॅटफॉर्मवर मनी लाँड्रिंग आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत. ॲपच्या जाहिरातीसाठी अनेक खेळाडू तसेच बॉलिवूड सेलिब्रिटींना कोट्यवधी रुपये देण्यात आले होते. या खेळाडूंमध्ये सुरेश रैनाचेही नाव होते. त्यामुळे या संदर्भात ED कडून त्याला समन्स बजावण्यात आले होते. सुरेश रैनाला आज चौकशीसाठी बोलावले आहे. जाहिरातीसाठी ॲपकडून खेळाडू आणि सेलिब्रिटींना कोट्यवधी रुपये दिले गेले होते. क्रिकेट बेटिंग ॲप प्रकरणी सुरेश रैना ED च्या रडारवर आलेला आहे.