Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 13 AUG 2025 : ABP Majha
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. त्यांनी मुख्यमंत्री फडणविसांवर मराठा आंदोलन उधळण्यासाठी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. जरांगे यांनी २७ ऑगस्टला मराठे आपल्या गाडीवरच गणपती बसवून भव्य मिरवणूक घेऊन मुंबईला जाणार असल्याचा इशारा दिला आहे. यावेळी गणपतीचं मुंबईतच विसर्जन करायचं आहे असंही जरांगे म्हणाले. "माझ्या पोटात जे आहे ते तोंडात असतंय," असे जरांगे यांनी म्हटले. यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांवर मुंबईत जाळपोळ आणि दंगली भडकावण्याचा गंभीर आरोप केला आहे. बीड शहरात घडलेल्या घटना मुंबईत घडवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं हाके यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे, माजी आमदार बच्चू कडूंना मुंबई सत्र न्यायालयानं सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोषी ठरवत तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांना तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी पाच हजार रुपये दंडही ठोठावला आहे. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी १५ ऑगस्टला ग्रामसभांमध्ये ठराव पारित करण्याचे आणि शेतात राष्ट्रीय ध्वज फडकवून विरोध करण्याचे नियोजन आहे. अमेरिकेनं भारतावर ५० टक्के आयात शुल्क लागू केलं असून, याला भारत ५० हून अधिक देशांच्या साथीने उत्तर देण्याच्या तयारीत आहे. सर्वोच्च न्यायालयानं आधारकार्ड नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचा मोठा निर्णय दिला आहे.