Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा

Continues below advertisement

Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा

बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) आज सीआयडीसमोर शरण आला. वाल्मिक कराडने आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर वाल्मिक कराड 22 दिवसांनंतर समोर आला. वाल्मिक कराड शरण आल्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या ॲक्शनमुळे दाखवलेल्या तत्परतेमुळे शेवटी सीआयडीच्या समोर वाल्मिक कराडला शरण यावं लागलेलं आहे. प्रथमतः मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा इतक्या कणखर निर्णय आणि धडाथड निर्णय घेतले त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो, असं सुरेश धस यांनी सांगितले. पोलिसांनी वाल्मिक कराड शरण येण्यास भाग पाडले. वाल्मिक कराड यांची संपंत्ती जप्त झाली पाहिजे. तोपर्यंत आका जे गुन्हे करत होते..ते उघडे पडणार नाही. सुदर्शन घुले जो प्रमुख आरोपी आहे. ज्याने देशमुख यांना गाडीत खेचून हल्ला केला. राजकारण्यांनी सांगितलं होतं का संतोष देशमुख यांना मारा म्हणून... 2023 मध्ये माझ्या मतदारसंघात ओटू कंपनीच्या अधिकाऱ्यांना असच उचललं होतं. मी परळी पॅटन आणू नका, असं त्यांना बोललो होतो, असं सुरेश धस म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram