Suresh Dhas PC FULL : जिल्ह्याला पोलीस प्रमुख म्हणून आयपीएस दर्जाचा अधिकारी द्यावा - सुरेश धस

Continues below advertisement

Suresh Dhas PC FULL : जिल्ह्याला पोलीस प्रमुख म्हणून आयपीएस दर्जाचा अधिकारी द्यावा - सुरेश धस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अल्पकालीन चर्चेवर उत्तर दिलं. बीडच्या केजमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिलं आहे.  देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केली. वाल्मिक कराडचा एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.दुसऱ्या प्रकरणात संबंध आढळल्यास कारवाई करु, अशी घोषणा केली आहे.   देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली इथंपर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही. या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील. बीड जिल्ह्यातील लॉसनेस स्थिती पाहायला मिळतेय ती संपवावी लागेल. अवाडा एनर्जी यांनी फार मोठी गुंतवणूक पवनऊर्जा क्षेत्रात केलेली आहे. यातून मोठ्या प्रमाणावर कामं निघत आहेत, काही लोकांना रोजगार मिळतोय.  काही काम आम्हालाच द्या नाही तर खंडणी द्या, अशा मानसिकतेत काही लोक वावरत असल्याचं पाहायला मिळतं. याच गुन्ह्यामध्ये  6 डिसेंबरला अवाडा एनर्जीचं ऑफिस आहे तिथं अशोक घुले, सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले हे आरोपी तिथे गेले होते. त्यांनी वॉचमनला शिवीगाळ व मारहाण केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram