Devendra Fadanvis On Ajit Pawar :दादा तुम्हाला शुभेच्छा, तुम्ही जरुर एकदिवशी मुख्यमंत्री व्हा-फडणवीस
Devendra Fadanvis On Ajit Pawar :दादा तुम्हाला शुभेच्छा, तुम्ही जरुर एकदिवशी मुख्यमंत्री व्हा-फडणवीस
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित झालं आहे. नरहरी झिरवाळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत 5 डिसेंबरला शपथ घेतली होती. आता उद्या नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यानिमित्तानं देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील चौथ्या मंत्र्याचं नाव समोर आलं आहे. नरहरी झिरवाळ हे 2019- 2024 या काळात महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष होते. नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पक्षाच्या कोट्यातून शपथ घेण्यासाठी आमदार नरहरी झिरवाळ यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळून 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता नरहरी झिरवाळ यांच्या निमित्तानं दुसरं नाव मंत्रिपदासाठी समोर आलं आहे.