Suresh Dhas on Beed: धनंजय मुंडे फडणवीसांच्या भेटीवर धस म्हणतात, आका, उठो, गाडीत बसो
Suresh Dhas on Beed: धनंजय मुंडे फडणवीसांच्या भेटीवर धस म्हणतात, आका, उठो, गाडीत बसो
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात दररोज नवनवे गौप्यस्फोट करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी सोमवारी पुन्हा एकदा नव्या आरोपांची राळ उडवून दिली. संतोष देशमुख यांच्या हत्येमागील सूत्रधार असल्याचा ठपका असणारे वाल्मीक कराड आणि त्यांच्या 'आका'मध्ये सध्या द्वंद्व सुरु आहे. पोलिसांसमोर हजर व्हायचे की नाही यावरुन दोघांमध्ये वाद सुरु असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला. सुरेश धस यांनी सोमवारी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
वाल्मीक कराड यांना सीआयडीच्या पथकाने रविवारी रात्रीच अटक केली आहे, अशी चर्चा आज सकाळपासून होती. याबाबत विचारले असता वाल्मीक कराड यांनी म्हटले की, 'आका' आतमध्ये गेले आहेत की नाही, हे मी आता सांगणार नाही. मला सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती मिळाल्याशिवाय मी याबाबत काहीच बोलणार नाही. संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासावर मी समाधानी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्व यंत्रणा 150-200च्या स्पीडने कामाला लावल्या आहेत. ते म्हणतात ना, ' बकरे की माँ कब तक दुवा माँगेगी'. या प्रकरणातही दुवा फारकाळ चालणार नाही, दुवा अर्ध्यातच सुटणार आहे, असे सुरेश धस यांनी म्हटले.