ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 30 December 2024
ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 30 December 2024
हे ही वाचा...
आपल्या मनाप्रमाणे कारभार करण्यासाठी बीडमधून चांगल्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना आणून भ्रष्टाचार करण्यात आला. परळीमध्ये एका व्यक्तीच्या नावावर बँकेमध्ये 900 कोटींचे हस्तांतरण झाल्याचं दिसून येतंय आणि त्यामागे परळीचा 'आका' आहे असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केला. महादेव बेटिंग अॅप भ्रष्टाचाराचा तपास केला असता तो मलेशियापर्यंत पोहोचेल असा आरोपही त्यांनी केला. यासंबंधित सर्व कागदपत्रे ही पोलिस अधीक्षकांना दिले असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं.
आमदार सुरेश धस यांनी बीडचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा केली. त्यानंतर सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, परळीमध्ये एकाच व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचे बँक व्यवहार झाले आहेत. दुसऱ्या एका व्यक्तीच्या नावावरही तसेच व्यवहार झाले आहेत. यावर कोणत्या यंत्रणेने तपास केला पाहिजे? परळीत दोन लोकांकडे मोठं घबाड आहे. अजून असे किती लोक असतील याची माहिती घेतली पाहिजे.