Suresh Dhas on Beed Crime : आकांचं कार्यक्षेत्र वाढत चाललंय, लीकर लायसन्स घेतलंय - धस
Suresh Dhas on Beed Crime : आकांचं कार्यक्षेत्र वाढत चाललंय, लीकर लायसन्स घेतलंय - धस
हेही वाचा :
महायुती सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार रविवारी (15 डिसेंबरला) नागपुरात पार पडला. एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुतीच्या मंत्रिमंडळात तब्बल 25 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. दरम्यान शिवसेना आणि भाजपमधून विरोध होत असताना देखील आमदार संजय राठोड यांना मंत्रीपद देण्यात आलं आहे, त्यानंतर आता पुण्यात त्यांच्या नावाला विरोध दर्शवण्यात आला आहे,
'राठोडचा डाग शिंदेंच्या कपाळी' अशा प्रकारचे मजकूर लिहून कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या चेहऱ्यावरती क्रॉसफुली मारून पुण्यात निषेध बॅनर लावण्यात आले आहेत.
एकीकडे स्त्रियांसाठी लाडकी बहीण तर दुसरीकडे एका निष्पाप महिलेच्या हत्येचा आरोप असणाऱ्या आमदारास कॅबिनेट मंत्रीपद असा मजकूर यावर लिहिण्यात आला आहे. बॅनर कोणी लावले त्याचं नाव मात्र यावरती लिहण्यात आलेलं नाही. मात्र, महायुती सरकार हाच का तुमचा न्याय अशा प्रकारचे बॅनर रस्त्याच्या मधोमध पुण्यात लावण्यात आलेले आहेत. या बॅनरमुळे पुण्यात चांगली चर्चा रंगली आहे. दरम्यान मित्रपक्षांसह शिवसेनेतून देखील त्यांच्या नावाला विरोध होत असताना त्यांना मंत्रीपद देण्यात आलं आहे.