Suresh Dhas On Beed Case | कोण अमोल मिटकरी, आगीत तेल ओतण्याचं काम करू नको, सुरेश धस यांची टीका
Suresh Dhas On Beed Case | कोण अमोल मिटकरी, आगीत तेल ओतण्याचं काम करू नको, सुरेश धस यांची टीका
भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी करत त्यांनी विविध मागण्या संदर्भात चर्चा केली. यावेळी बोलताना वाल्मिक कराडसोबतच्या संबंधांवरून सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांना सुद्धा कडक इशारा दिला आहे.
धनुभाऊ आपले विमान खाली आणा
यावेळी बोलताना सुरेश धस यांनी मुंडे यांना ओपन चॅलेंज देताना तोफ डागली. ते म्हणाले की, धनुभाऊ आपले विमान खाली आणा. तुम्हाला पालकमंत्री व्हायचं आहे. आमचा लेकरू मेलं त्याला नाय द्यायचा आहे. तुला कोणी घेरले आहे..? हा काही राजकीय विषय नाही. मोर्चात वंजारी समाजाचे लोक सहभागी होणार आहेत. मुस्लिम लोकही सहभगी होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री यांना टरबूज ही उपाधी सोशल मीडियाने दिली, पण काय झालं? आता मला ट्रोल करत आहेत. फेक अकाउंटवरून बोलले जात आहेत. दम असेल तर समोर येऊन बोला, असा इशाराही त्यांनी दिला.