Drugs Politics: 'ड्रग्ज तस्करीला राजाश्रय', Supriya Sule यांचे CM Fadnavis यांना पत्र

Continues below advertisement
खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील (Tuljapur Drugs Case) आरोपीच्या भाजप (BJP) प्रवेशावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या पक्षप्रवेशामुळे 'ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय', अशी थेट टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, लोकशाहीत पक्ष वाढवण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण समाजविघातक प्रवृत्तींना थारा देणे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. या गंभीर प्रकाराकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून, सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola