Sangli Crime : वाढदिवशीच Dalit Mahasangh जिल्हाध्यक्ष Uttam Mohite यांची हत्या, हल्लेखोरही ठार
Continues below advertisement
सांगली शहरातील गारपीर चौकात एक धक्कादायक घटना घडली असून, यात दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांची त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यासाठी आलेल्यांपैकी एक हल्लेखोर, शाहरुख शेख, याचाही जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला, ज्यामुळे शहरात एकाच वेळी दोन खुनांच्या घटनेने खळबळ उडाली आहे. 'या खुनामागचं कारण अद्याप अजून स्पष्ट नसतानाही दोघांच्यामधील काही जुना वाद आहे का या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे,' असे घटनास्थळावरून सांगण्यात आले. रात्री उशिरा झालेल्या या 'मुळशी पॅटर्न' स्टाईल हत्याकांडानंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इतर हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement