Supriya sule Full PC:आमच्यासाठी हा काळ संघर्षाचा,आव्हानांवर मात करुन सत्याचा विजय होईल-सुप्रिया सुळे
Supriya sule Full PC:आमच्यासाठी हा काळ संघर्षाचा,आव्हानांवर मात करुन सत्याचा विजय होईल-सुप्रिया सुळे Rohit Pawar ED Inqury : मुंबई : बारामती अॅग्रो कथित घोटाळा प्रकरणी (Baramati Agro Scam Case) राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांना ईडीनं (ED) चौकशीसाठी समन्स बजावलेलं. रोहित पवार (Rohit Pawar) यांना आज म्हणजेच, 24 जानेवारीला चौकशीसाठी पाचारण करण्यात आलेलं. त्यानुसार आज रोहित पवार ईडी चौकशीसाठी हजर झालेत. साधारणतः सकाळी साडेदहा वाजता रोहित पवार ईडी कार्यालयात पोहोचले. चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी यापूर्वीच दिली होती. तसेच, कार्यकर्त्यांनाही शांत राहण्याचा सल्ला रोहित पवारांनी दिला होता. तसेच, ईडी कार्यालयात दाखल होण्यापूर्वी मी मराठी माणूस आहे, पळून जाणार नाही, असं रोहित पवार म्हणाले.