Supriya Sule On Mahayuti:बहिणींच्या घरावरील रेड ते निलेश लंकेंचं आंदोलन;सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Supriya Sule On Mahayuti:बहिणींच्या घरावरील रेड ते निलेश लंकेंचं आंदोलन;सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया  शेतकऱ्यांच्या कांद्याला (Onion) आणि दुधाला (Milk) योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मविआच्या "शेतकरी जन आक्रोश" आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे आंदोलनस्थळी भेट देणार आहेत.   शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ (Siddharam Salimath) यांनी आंदोलनस्थळी यावं, अशी भूमिका खासदार निलेश लंके यांची आहे. मात्र निवासी उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांनी आंदोलकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आंदोलन स्थळी भेट दिली होती.   जिल्हाधिकाऱ्यांनीच शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहचव्यावात जिल्हाधिकाऱ्यांनीच आंदोलकांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहचव्यावात अशी भूमिका निलेश लंके यांनी घेतली आहे. त्यामुळे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार आहे. दरम्यान आंदोलनाच्या चौथ्या दिवशी म्हणजे उद्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हे देखील भेट देणार असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली. त्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram