Supriya Sule On EVM Machine : EVM विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार, सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद
Continues below advertisement
Supriya Sule On EVM Machine : EVM विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार, सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे परवा म्हणजे रविवारी मारकडवाडी (Markadwadi) येथे येणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता शरद पवार हे हेलिकॉप्टरने मारकडवाडी येथे येणार आहेत. ईव्हीएम (EVM) विरोधातील देशात मारकडवाडी हे पहिले गाव होते ज्याने बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी आंदोलन केले होते. याच ठिकाणी आता राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे नेतेही लवकरच भेट देणार असून रविवारी शरद पवार पहिल्यांदा इथे पोहोचणार आहेत.
माळशिरसचे आमदार आणि या आंदोलनाचे नेते उत्तमराव जानकर यांचा शपथविधी देखील रविवारीच होणार होता. मात्र, त्यांनी आता अध्यक्षांची परवानगी घेऊन सोमवारी अध्यक्षांच्या दालनात शपथ घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
Continues below advertisement