Supriya sule On MNS : मनसे मविआत येणार का ते पाहावं लागेल, सुप्रिया सुळेंचं विधान
Supriya sule On MNS : मनसे मविआत येणार का ते पाहावं लागेल, सुप्रिया सुळेंचं विधान
मनसेशी युती करणार का? या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी काल मोठं वक्तव्य केलं. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. आता संदेश नाही थेट बातमी देणार, असं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट सांगितलं. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान आज मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या उपाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील शिवतीर्थ येथे ही बैठक पार पडले. त्यामुळे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना नेमका कोणता कानमंत्र देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, अशी चर्चा रंगलीय. अनेक नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया, सूचक वक्तव्यही येतायत. पण या सर्व चर्चांवर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडेंनी, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावं असं म्हंटलं आणि त्यानंतर अवघ्या तासाभरात उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंसोबत युतीवर मोठं वक्तव्य केलंय. जे जनतेच्या मनात ते होईल असं म्हणत, आता थेट बातमीच देऊ असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे.