Pankaja Munde Speech : धनंजय मुंडेंना बरं नाही ते बोलले तू बोल, पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
Pankaja Munde Speech : धनंजय मुंडेंना बरं नाही ते बोलले तू बोल, पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
पंचायत समिती परळी व आंबेजोगाई यांच्या वतीने दिवाळी नवीन घरकुलात या कार्यशाळेच इथे आयोजन केलेल आहे. या कार्यशाळेसाठी मला त्यांनी बोलावलं या जिल्ह्याची संपर्क मंत्री म्हणून आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित या परळी मतदार संघाचे. आमदार माझे बंधू धनंजय मुंडे हे इथे आवर्जून उपस्थित आहेत. मंचावर उपस्थित आहेत जिल्हाधिकारी बीड विवेक जॉनसन, आदित्य जीवनी, जिल्हा परिषद सीओ, वासुदेव सोळंके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अरविंद लाडकर, उपविभागीय अधिकारी, संजय नलावडे, सहायक प्रकल्प अधिकारी, संजय केंद्रे, बीडीओ, समृद्धि दिवाणे, बीडीओ अंबेजोगाई आणि मतदारसंघातील इथे समोर उपस्थित असलेले सर्व सरपंच, रोजगार सेवक, महिला बचत गटातील आलेले सर्व माझ्या माता भगिनी आणि सर्व लाभार्थी आणि सर्व अधिकारी वर्ग सर्वप्रथम मी या कार्यशाळेचा मनापासून कौतुक करते आणि मनापासून शुभेच्छा देते. धनंजय यांनी सांगितलं की त्यांना तूच माझ्या वतीने बोल तर ठीक आहे आता माझ्यावर मला वाटलं होतं की ते असल्यामुळे माझं भाषण जरा मला रिलॅक्स करता येईल जास्त करायची गरज नाही तर त्यांनी सांगितलं तूच बोल आणि मला त्यांनी काही सूचना. व्यापक विषय, महिला शिक्षण, मुलींच पोषण हे व्यापक विषय मांडलेले होते आणि ग्रामीण विकास विभागाला मी न्याय देऊ शकेन का असा माझ्या मनाला प्रश्न वाटत होता आणि तेव्हाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी म्हणजे आम्ही ते प्रधानमंत्री झाले आणि मग मी मंत्री झाले, ग्रामीण विकास मंत्री झाले, राज्यामध्ये तेव्हा आमच सरकार आलं, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाले आणि तेव्हा त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये भरपूर बदल केले, आपल्याकडे घरकुलाच्या त्यांनी सांगितलं की या देशामध्ये जो नागरिक आहे, एक माणूस या देशामध्ये राहतो, तो सांगतो की हे देश माझा आहे, या देशाचा मी नागरिक आहे.