Supriya Sule Mobile Hack: सुप्रिया सुळेंच्या मोबाईलसह व्हॉट्सॲप हॅक झाल्याची सुप्रिया सुळेंची माहिती

Supriya Sule Mobile Hack:सुप्रिया सुळेंच्या मोबाईलसह व्हॉट्सॲप हॅक झाल्याची सुप्रिया सुळेंची माहिती

माझे व्हॉट्सॲप सुरू झाले आहे. व्हॉट्सॲप टीमने यासाठी अतिशय मोलाचे सहकार्य केले. याबद्दल टिम व्हॉट्सॲप व पुणे ग्रामीण पोलीसांचे मनापासून आभार. दरम्यानच्या काळात कुणी मेसेज केले असतील तर त्यांना मला या तांत्रिक बिघाडामुळे रिप्लाय करता आला नाही, याबद्दल क्षमस्व .  नागरीकांना माझी विनंती आहे की,  आवश्यक ती सर्व काळजी घेऊनही माझे व्हॉट्सॲप हॅक झाले होते.  कृपया आपण सर्वजण डिजिटल सुरक्षेविषयी आवश्यक ती काळजी घ्या. व्हॉट्सॲप वापरताना टू फॅक्टर व्हेरीफिकेशन करुन घ्या. आपले पासवर्ड, ओटीपी कुणालाही देऊ नये. तसेच अनोळखी क्रमांकावरुन आलेल्या लिंक क्लिक करु नये. डिजिटल सुरक्षा हि अतिशय महत्त्वाची बाब असून आपण आवश्यक ती काळजी घ्यावी.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola