Yashomati thakur : यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याचा विर्पयास करण्यात आला! खासदार सुप्रिया सुळेंकडून यशोमतींची पाठराखण
महिला आणि बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर ठपका ठेवला आहे. बालसंगोपन निधी अनुदानात वाढ करण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार साथ देत नसल्याचा आरोप केला. मात्र यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याचा विर्पयास करण्यात आला असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यातील पारस फाट्यावरील कार्यक्रमात विर्पयास यांनी हे वक्तव्य केलं होतं.