Supreme Court on Shinde Fadnavis : द्वेषमूलक वक्तव्यांवरुन सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं
द्वेषमूलक वक्तव्यांबाबत सरकारकडून कुठलीच कारवाई होत नसल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने बुधवारी पुन्हा चिंता व्यक्त केली. सरकारी व्यवस्था निष्क्रीय आणि शिथील बनली आहे.. जर शांतच बसून राहणार असेल तर मग ही व्यवस्था आहे तरी कशासाठी.. असा संतप्त सवाल सुनावणीच्या दरम्यान न्यायमूर्ती के एम जोसेफ यांनी विचारला. महाराष्ट्रात गेल्या 4 महिन्यात 50 मोर्चे निघाले, त्यात काही द्वेषमूलक वक्तव्यं झाल्याची बातमी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारला कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी जबाबदार धरा, अशी याचिका दाखल करण्य़ात आली होती.. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. कुठल्याही तक्रारीची वाट न बघता आणि कुठल्याही धर्माचा विचार न करता तातडीने कारवाई करावी अशा पद्धतीचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते. कोर्टाच्या याच निर्णयाचा आधार घेत निजाम पाशा यांनी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात कोर्टात धाव घेतली.