सांगली-कोल्हापुरातील पुरावर नियंत्रण मिळणार,50 किमीचा अजस्त्र बोगदा,कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना!

Continues below advertisement

स्थापत्य कलेचं अद्भूत ठरलेलं असं काम महाराष्ट्राला दाखवण्यासाठी एबीपी माझाची टीम जमिनीच्या खाली 270 फुटांवर पोहेचली. पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यात 23 आणि उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये 28 किलोमीटर असे दोन बोगदे बनत आहेत. हे भारतातले सर्वात लांब बोगदे असू शकतात. कृष्णा खोऱ्यातलं पाणी स्थिर करून मराठवाड्याला देण्यासाठी हे काम सुरू आहे. सध्या मराठवाड्याच्या हक्काच्या 21 पैकी फक्त सात टीएमसी पाणीच मिळत असले तरी या कामामुळे कोल्हापूर, सांगलीच्या पुरावर काही प्रमाणात नियंत्रण येण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प मे 2023 पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. पाहा कृष्णा मराठवाडा जलसिंचन योजना!

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram