Sunil Tingare on Sharad Pawar Notice : शरद पवारांना कोणतीही नोटीस दिली नव्हती - टिंगरे

Continues below advertisement

Sunil Tingare on Sharad Pawar Notice  : शरद पवारांना कोणतीही नोटीस दिली नव्हती - टिंगरे 

 पुण्यातील कल्याणीनगर येथे घडलेल्या पोर्शे कार अपघाताप्रकरणात नाव घेऊन बदनामी केली तर कोर्टात खेचीन, अशी नोटीस  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवली असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी काल(शुक्रवारी म्हटलं) आहे. त्या नोटिसवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी टिंगरेंना टोला लगावला.  ज्या शरद पवार साहेबांनी मागील निवडणुकीकरता एबी फॉर्मवर सही करून सुनील टिंगरे यांच्या हातात फॉर्म दिला. त्यांनीच आज पवार साहेबांना नोटीस पाठवली आहे, असं सुळेंनी म्हटलं, त्यावरती मी नोटीस पाठवली नसल्याचं आमदार सुनील टिंगरे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे.  नेमकं काय आहे प्रकरण? पुण्यातील वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरेंनी पोर्शे अपघात प्रकरणात त्यांच्यावर टिका करु नये यासाठी शरद पवारांना नोटीस बजावल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी काल (शुक्रवारी) प्रचार सभेत केला. मात्र, त्यावर आमदार सुनिल टिंगरे यांनी आपण शरद पवारांना अशी कोणतीही नोटीस बजावली नसल्याचा दावा केला आहे. आपण महाविकास आघाडीतील पक्षांना आपल्यावर होत असलेल्या टिकेबद्दल एक कॉमन नोटीस बजावली होती. मात्र, शरद पवार किंवा कोणत्या नेत्याला आपण नोटीस बजावली नव्हती असं आमदार टिंगरे म्हणालेत. शरद पवार आजही आपले दैवत आहेत असंही आमदार सुनिल टिंगरेंनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram