Konkan : कोकणात महाविकास आघाडीतील दोन नेत्यांमध्ये जुंपली, सुनील तटकरे-भास्कर जाधव यांच्यात कलगीतुरा

कोकणात महाविकास आघाडीतील दोन नेत्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झालाय. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यात कलगीतुरा रंगलाय. तटकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या दापोलीतील कार्यकर्त्यांनी  राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर हा वाद आणखी चिघळलाय. कुणबी समाजाच्या एका वास्तूला निधी देण्यावरून जाधवांनी तटकरेंवर टीका केली. त्यावरून तटकरे यांनी जाधवांना टोला लगावला आणि त्यामुळे संतप्त झालेल्या भास्कर जाधवांनी पलटवार केला. तटकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करतानाच नाव राष्ट्रवादी आणि आयुष्यभर कुटुंबवादी अशी टीका जाधव यांनी केली आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola