Sunil Shelke Pune : बारामतीला निधी मिळाल्यावर आम्ही विरोध केला का ? सुनिल शेळकेंचा सवाल
Sunil Shelke Pune : बारामतीला निधी मिळाल्यावर आम्ही विरोध केला का ? सुनिल शेळकेंचा सवाल मावळला सर्वाधिक निधी का दिला जातो? असा मुद्दा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील डीपीडीसीच्या बैठकीत उपस्थित केला होता. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मावळचे आमदार सुनील शेळके संतापले होते. दरम्यान, बैठकीतून बाहेर पडल्यानंतर सुनील शेळकेंनी प्रतिक्रिया दिली आहे. "इतर तालुक्यांना देखील निधी मिळावा, अशी आमची देखील भावना आहे. परंतु मावळला अधिकचा निधी मिळत असताना आपण कोणताही खोडा घालू नये, अशी माझी विनंती आहे. ", असं सुनील शेळके म्हणाले आहेत. माझ्याकडून आणि अमोल कोल्हेंकडून काही कमतरता राहत असतील, सुळेंचा बारणेंना टोला सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून आमचा सर्वांचा डीपीडीसीचा अनुभव चांगला राहिलेला आहे. पहिल्यादांच असं झालय. आम्ही यामध्ये श्रीरंग बारणे यांचंही मार्गदर्शन घेतलं. कदाचित असंही होतं असेल की, माझ्याकडून आणि अमोल कोल्हेंकडून काही कमतरता राहत असतील. त्यामुळे श्रीरंग बारणेंना जास्त झुकतं मापं दिलं जात. त्यामुळे आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतलं. त्यांना म्हटलं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. आणखी निधी मतदारसंघात कसा आणायचा हे देखील सांगा म्हटलं.