Sunil Shelke : Shrirang Barne यांना कमळाच्या चिन्हावरही उमेदवारी देऊ नका...सुनील शेळकेंचं वक्तव्य

Continues below advertisement

शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंना भाजपमध्ये घेऊन, कमळाच्या चिन्हावर उमेदवारी दिली तरी माझा विरोध कायम असेल. अशी ठाम भूमिका मावळमधील अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेनीं घेतलीये. कमळाच्या चिन्हावर बारणे उमेदवार असले तरी आमची हरकत नसेल, असं भाजपचे पदाधिकारी म्हणाले होते. पण मावळ लोकसभेतून बारणेंना उमेदवारी का देऊ नये, हे सुचविणारा एक अहवालचं शेळकेनीं तयार केलेला आहे. तो अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलाय. त्याचाच दाखला देत, मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावी यावर ते शेळके ठाम आहेत. त्यांच्याशी संवाद साधलाय नाजिम मुल्ला यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram