Sunil Prabhu on Beed Crime : एसआयटीपेक्षा सीटिंग जजमार्फत या प्रकरणाची चौकशी करा - सुनील प्रभू

Continues below advertisement

Sunil Prabhu on Beed Crime : एसआयटीपेक्षा सीटिंग जजमार्फत या प्रकरणाची चौकशी करा - सुनील प्रभू

हेही वाचा : 

केंद्रीय मंत्री अमित शाह या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. यावरुन काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी रान उठवले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप खासदारांना काँग्रेसवरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा ठपका ठेवत गुरुवारी संसदेत निषेध आंदोलन केले. हे आंदोलन सुरु असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप भाजपचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांनी केला. राहुल गांधी यांनी एका खासदारला धक्का दिला. त्यामुळे तो खासदार माझ्या अंगावर पडला आणि माझ्या डोक्याला जखम झाली, असा दावा प्रताप चंद्र सारंगी यांनी केला.  नव्या संसदेच्या मकर द्वाराच्या परिसरात हा धक्काबुकीचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. प्रताप चंद्र सारंगी जखमी झाल्यानंतर भाजपच्या काही खासदारांनी मल्लिकार्जून खरगे आणि प्रियांका गांधी यांनाही धक्काबुक्की केल्याचे समजते.   प्रताप चंद्र सारंगी काय म्हणाले? राहुल गांधींनी एक खासदाराला माझ्या अंगावर ढकलले, त्यामुळे मी खाली पडलो आणि जखमी झालो. मी पायऱ्यांवर उभा होतो. त्यावेळी राहुल गांधींनी धक्का दिलेला खासदार माझ्या अंगावर पडला, असा सारंगी यांचा दावा आहे. दरम्यान, प्रताप सारंगी यांना या प्रकारानंतर तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रताप सारंगी यांच्या डोक्याला जखम झाली आहे. त्यांच्यावर सध्या दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर भाजप खासदार मुकेश राजपूत यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पीयूष गोयल , धर्मेंद्र प्रधान , शिवराज सिंह चौहान आणि प्रल्हाद जोशी इस्पितळात पोहचले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram