Sunetra Pawar vs Supriya Sule Special Report : बारामतीत सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांचं आव्हान?
Continues below advertisement
बारामती, पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना पाहायला मिळणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी द्यावी मागणी वीरधवल जगदाळे यांनी केली आहे. वीरधवल जगदाळे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यंच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
वीरधवल जगदाळे पुणे जिल्हा परिषद माजी सदस्य आहेत. सुनेत्रा पवार यांचे बारामती लोकसभा मतदारसंघात काम आहे. त्यांच्यासाठी चांगले वातावरण आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केली आहे.
Continues below advertisement