Sunetra Pawar : दादांच्या राष्ट्रवादीचं ठरलं! राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची काल रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आज दुपारी दीड वाजता सुनिता पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी छगन भुजबळ पार्थ पवार, आनंद परांजपे बाबा सिद्दिकी इच्छुक होते.

पार्थ पवारही राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छूक

राज्यसभेच्या या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील 11 ते 12 जण इच्छूक होते. यामध्ये पार्थ पवार यांचाही समावेश आहे. पार्थ पवार यांनी देखील कुटुंबातील सदस्य खासदार व्हावा, यासाठी मंगळवारी प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची भेट घेतली होती.  पार्थ पवार हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीही इच्छूक असल्याची चर्चा होती. मात्र, तेव्हा संधी न मिळाल्याने ते राज्यसभेवर जाणार का, याबद्दल उत्सुकता आहे. उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये उमेदवारीचा हा सस्पेन्स संपू शकतो. अजित पवार गटाच्या खासदारांची संख्या वाढल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्रीपदावरील त्यांचा दावा भक्कम होईल. त्यादृष्टीने राज्यसभेची ही निवडणूक महत्त्वाची आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola