Sunetra Pawar RSS Meeting | सुनेत्रा पवार यांची राष्ट्रसेविका समिती बैठकीला हजेरी, राजकीय चर्चांना उधाण!
abp majha web team Updated at: 21 Aug 2025 01:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावली. महायुतीमध्ये असूनही अजित पवार संघाच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत. मात्र त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला उपस्थिती लावल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावेळी महायुतीच्या सर्व सांसदांना हेडगेवार स्मारक येथे बौद्धिकाचे आमंत्रण असते. परंतु, अजित पवार आणि त्यांचे आमदार तिथे जात नाहीत. त्याचप्रमाणे दिल्लीतही अधिवेशनाच्या वेळी संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला अजित पवारांच्या पत्नी उपस्थित राहिल्या. भाजप खासदार कंगना रनौत यांनी या बैठकीचा फोटो ट्वीट केला आहे. या फोटोमध्ये सुनेत्रा पवार यांच्या मागे भारतमातेच्या फोटोसह डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींचाही फोटो दिसत आहे. ही उपस्थिती राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.