Sunetra Pawar : राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुनेत्रा पवार विधानभवनात दाखल

Continues below advertisement

Sunetra Pawar Application for Rajya Sabha Candidacy: पुणे : राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election 2024) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीत (NCP) गेल्या अनेक दिवसांपासून खलबतं सुरू होती. अशातच आता राज्यभेसाठी (Rajya Sabha) अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी रात्री उशिरा अजित पवारांचं निवासस्थान असलेल्या देवगिरीवर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ सुत्रांनी एबीपी माझाला यासंदर्भात माहिती दिली आहे. आज दुपारी दीड वाजता सुनेत्रा पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. आज राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ, पार्थ पवार, आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या. अशातच आता सुनेत्रा परावांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून आजच त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

एबीपी माझाला वरिष्ठ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यसभा उमेदवाराची घोषणा आज करण्यात येणार आहे. आजच संबंधित उमेदवाराचा उमेदवारी अर्ज देखील भरण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी पार्थ पवार, सुनेत्रा पवार, बाबा सिद्दिकी, समीर भुजबळ, आनंद परांजपे यांची नावं चर्चेत होती. अखेर सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय राष्ट्रवादीकडून घेण्यात आला आहे. घराणेशाहीचा आरोप स्वीकारुन, अनेक ज्येष्ठ नेत्यांची नाराजी ओढवून, अजितदादांनी घरातलाच उमेदवार दिला आहे, आता अजित पवारांची ही खेळी कितपत योग्य ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram