Sukesh Chandrashekhar: सुकेश चंद्रशेखरमुळे शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूर ईडीच्या रडारवर? ABP Majha

गेल्या काही महिन्यांमध्ये विविध तपास यंत्रणांनी बॉलिवूडचे काही अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी केली होती. त्यात प्रामुख्याने अमली पदार्थांशी संबंध होता. मात्र, आता बॉलिवूड अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहे. आता सुमारे २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूर आणि नोरा फतेही यांची नावे समाोर आली आहेत. सुकेशकडून त्यांनी अतिशय महागडे गिफ्ट घेतले असून अशा १५ अभिनेत्रींवर ईडीची नजर आहे. याशिवाय श्रद्धा कपूरचेही नाव सुकेशने घेतले आहे. अभिनेता सुशांत राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणात एनसीबीने अमली पदार्थांच्या चौकशीसाठी तिला बोलाविले हाेते. तिला याप्रकरणातून बाहेर पडण्यासाठी मदत केली हाेती, असे सुकेशने तपास अधिकाऱ्यांना सांगितले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola