Suhas Kande Shivsena : शिवसेनेच्या सुहास कांदेंच्या उमेदवारीला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा विरोध

Continues below advertisement

Suhas Kande Shivsena : शिवसेनेच्या सुहास कांदेंच्या उमेदवारीला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा विरोध 

हेही वाचा : 

अकोल्यातील एका कार्यक्रमात भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांच्या भाषणादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर, योगेंद्र यादव यांचं भाषण बंद पाडण्यात आलं. अकोल्यात आज योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनात 'लोकशाहीची सुरक्षा आणि आपलं मत' या चर्चेवर विचार सभा सुरू होती. या विचारसभेत योगेंद्र यादव (Yogendra yadav) भाषण करत असताना वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी माईक हातातून हिसकावून घेत गोंधळ घातला. योगेंद्र यादव यांच भाषण सुरू असताना त्यांच भाषण बंद पाडण्यात आल्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अकोल्यातल्या (Akola) जिल्हा परिषदच्या कर्मचारी भवन मधला हा संपूर्ण प्रकार असून या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियातून व्हायरल झाले आहेत. वंचितच्या कार्यकर्त्यांनी स्टेजवर मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्याने काही काळासाठी तेथील वातावरण चिंताजनक बनले होते. तर, संयोजकांनी योगेंद्र यादव यांच्याभोवती सुरक्षेचं वर्तुळ निर्माण केल्याचंही पाहायला मिळालं.   योगेंद्र यादव यांच्या कार्यक्रमात संविधानाच्या दृष्टिकोनातून काय चर्चा झाल्या, जवाब दो.. जवाब दो... असे नारे देत वंचितच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावेळी, काही कार्यकर्त्यांनी स्टेजवर जातं माईक हाती घेऊन सामानाची फेकाफेकही केल्याचं दिसून आलं. त्यामुळे, नियोजितपणे सुरू असलेला योगेंद्र यादव यांचा येथील कार्यक्रम बंद पाडण्यात आला आहे. मात्र, वंचितच्या पदाधिकाऱ्यांकडून कशामुळे हा गोंधळ घालण्यात आला, यावर अद्याप स्पष्टपणे सांगण्यात येत नाही. पण, संविधानाच्या अनुषंगाने काय चर्चा केल्या, काय विचारमंथन केले, असा जाब वंचितकडून विचारला जात आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram