Sugar Factory : विनापरवाना ऊस गाळप केलेल्या साखर कारखान्यांना दणका : ABP Majha

Continues below advertisement

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी २०२२-२३ च्या हंगामात विनापरवाना ऊस गाळप केलेल्या साखर कारखान्यांना दणका दिला आहे. ऊस गाळप परवाना उल्लंघनप्रकरणी राज्यातील २२ कारखान्यांना त्यांनी १७६.५४ कोटींचा दंड केला... यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक आठ कारखान्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार एफआरपीची रक्कम व अन्य शासन निधीची कपात दिल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्यांना २०२२-२३ मधील ऊस गाळप परवाना द्यायचा नाही, असा धोरणात्मक निर्णय झाला होता. तरीही काही कारखान्यांनी या निर्णयास वाटाण्याच्या अक्षता लावून शासनाची विविध देय रक्कम आणि थकीत एफआरपी देणे बाकी असतानाही परस्पर विनापरवाना ऊस गाळप सुरू केले होते.
    

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram