Sudhir Mungantiwar On Manoj Jarange : संवाद करून प्रश्न सुटू शकतात, सरकार सकारात्मक:सुधीर मुनगंटीवार

Continues below advertisement

आंतरवाली सराटी (जि. जालना) : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीतून उपोषण थांबवत तडक आता मुंबईच्या दिशेने फडणवीसांच्या सागर या शासकीय बंगल्याच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्या आरोपावर उत्तर देण्यास टाळलं आहे. पुन्हा विचारले असता ते म्हणाले की, मी ऐकलंच नाही आणि मी कशा कशाला उत्तर देऊ? असा पवित्रा घेतला. यानंतर ते तातडीने हेलिकाॅप्टरने सातारला रवाना झाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram