Sudhir Mungantiwar on Cabinet : मंत्रिमंडळ विस्तारावर सुधीर मुनगंटीवार यांचं नवं वक्तव्य ABP Majha

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत रोज नव्या तारखा मिळत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आता नवं वक्तव्यं केलंय. १५ ऑगस्टआधी शपथविधी नक्की होणार, असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. अमृत महोत्सवी  झेंडावंदन असल्यानं त्याआधी विस्तार करावाच लागेल' असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. स्वातंत्र्यदिनाआधी शपथविधी झाला नाही, तर प्रथेप्रमाणे जिल्हा मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन करता येणार नाही. त्यामुळे त्याआधी विस्तार होईल, असं मुनगंटीवार यांचं म्हणणं आहे.. यामुळे उद्या मंत्रिमंडळ होणार की नाही याबाबत मात्र अजूनही निश्चितता असल्याचं दिसतंय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola