CM Eknath Shinde यांचे दिवसभरातले प्रशासकीय कार्यक्रम रद्द, तर उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना
CM Eknath Shinde : आज राज्याच्या राजकारणात एक मोठा योगायोग पाहायला मिळाला.... मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज आपापले दिवसभरातले प्रशासकीय कार्यक्रम रद्द केले... अर्थात दोघांचीही कारणं वेगळी होती... सततचे अतीव्यस्त दौरे आणि पहाटे पर्यंतच्या सभांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवतोय. डॉक्टरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सक्त आरामाचा सल्ला दिला आहे त्यामुळे त्यांनी आजचे कार्यक्रम रद्द केलेले आहेत... तर उपमुख्यमंत्री आज तातडीनं दिल्लीत पोहोचलेत.... उपमुख्यमंत्र्यांनी आजचे कार्यक्रम तातडीनं रद्द करत दिल्लीला गेलेत... वरकरणी या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी अशा योगायोगांची राजकीयच वर्तुळात चर्चा होते.
Tags :
Maharashtra News Live Marathi News Devendra Fadnavis ABP Majha LIVE Delhi Eknath Shinde Marathi News ABP Maza Politics Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv