Sudhir Mungantiwar | खडसे अशा पद्धतीने पक्ष सोडतील यावर विश्वास बसत नाही : सुधीर मुनगंटीवर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
खूप दिवसांपासून नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आपण भाजप नेतृत्वावर नाराज नसून देवेंद्र फडणवीसांमुळं राजीनामा देत असल्याचं खडसेंनी सांगितलं. आपलं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला असल्याचं खडसे म्हणाले. एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. येत्या शुक्रवारी ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.